Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

टेम्पो, दुचाकी चोरीसह घरफोडी करणा-या दोघांना जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी टेम्पो आणि दुचाकी हस्तगत केली आहे. सचिन सुधाकर दवंगे पाटील (२७) आणि उमेश देविदास मुळे (४५, दोघेही रा. कैलासनगर) अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे चोरलेला टेम्पो घेऊन जाताना हे दोघेही हर्सुल टोलनाक्याच्या सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाले होते. त्यावरुन पोलिसांनी त्यांचा शोध घेतला.
कैलासनगरातील सिमेंट विक्रेता संदीप किशोर सरीन (३४) यांनी अडीच वर्षांपुर्वी सिल्लोड तालुक्यातील रफीक देशमुख यांच्याकडून टेम्पो (एमएच-२०-बीटी-१२८७) खरेदी केला होता. हा टेम्पो नेहमीप्रमाणे २३ डिसेंबर रोजी कैलासनगरातील स्मशान मारुती मंदिरासमोर उभा होता. भरदिवसा त्यांचा टेम्पो दवंगे आणि मुळेने लांबविला. हा प्रकार लक्षात आल्यावर सरीन यांनी जिन्सी पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरुन जिन्सी पोलिसांनी शहरातील नजीकच्या टोलनाक्यांची तपासणी केली. तेव्हा हर्सुल टोल नाक्यातील सीसी टिव्ही फुटेजमध्ये हे दोघेही कैद झाले होते.
……
टेम्पोनंतर दुचाकीही चोरली…….
सरीन यांचा टेम्पो जळगाव रस्त्यावरील वाणेगाव फाट्यावर बंद पडला. त्यामुळे दोघांनी हा टेम्पो दवंगेच्या शेतात उभा केला. त्यानंतर त्यांनी शहरात येण्यासाठी वाणेगाव फाट्यावरील एका हॉटेलसमोर उभी असलेली शेषराव नारायण लगड (रा. फुलंब्री) यांची दुचाकी २४ डिसेंबर रोजी चोरली. चोरीच्या दुचाकीवर दोघेही शहरात दाखल झाले.
…….
भानुदासनगरात केली घरफोडी…..
जवाहर कॉलनीतील भानुदासनगरात २२ डिसेंबर रोजी या दोघांनी बालिका ढाकणे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने लांबविले होते. दोघांकडून टेम्पो आणि दुचाकी जप्त केल्यानंतर त्यांनी ढाकणे यांचे घर फोडल्याची कबुली दिली. या दोघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते, उपनिरीक्षक दत्ता शेळके, रफी शेख, संपत राठोड, जमादार व्ही. एस. काकडे, रमेश नजन, रामदास खाजेकर, हारुण शेख, संजय गावंडे, गणेश नागरे, सुनील जाधव यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!