Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : रेकाॅर्डवरचा गुन्हेगार खोपोलीपतून अटकेत , ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंगाबाद – हिरो कंपनीच्या मोटरसायकलचे २४लाख रु.चे स्पेअरपार्ट चोरी करणारा रेकाॅर्डवरचा आरोपी कबीर बुढन पठाण(२८) याला वाळूज औद्योगिक पोलिसांनी खोपोलीहून अटक करुन आणले.२०१५साली ही कबीर पठाणवर वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

गेल्या १४डिसैंबर रोजी एम.आय.डी.सी. वाळूज परिसरातील अरोरास्पेस झोन नावाच्या वेअरहाऊस मधून कबीर पठाण ने शाॅकअप्स, ब्लाॅकपिस्टनकीट, हेल्मेट, व्हिलरिम , वाॅलकिट असा २४लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी १६ डिसेंबर रोजी एम..वाळूज पोलिसठाण्यात गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याचे सी.सी. टि.व्ही. फुटेजही पोलिसांना मिळाले होते.
या नंतर खबर्‍या मार्फत पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांना माहिती मिळाली की, अरोरा स्पेस झोन मधील आरोपी रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात खालापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लपून बसलेले आहेत. पोलिस निरीक्षक गायकवाड यांचे एक पथक पी.एस.आय. विठ्ठल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली परिसरात तळ ठोकून बसले होते. गुरुवारी सकाळी १०वा. पोलिसांकडे असलेल्या सी.सी. टि.व्ही. फुटेज मधील आरोपी खालापूर जवळील बावोशी परिसरात आढळून आला.तो कबीर पठाण असल्याचे निष्पन्न होताच त्याला विश्र्वासात घेऊन चौकशी केली असता कबीर पठाण ने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच बावोशी परिसरात गुन्ह्यात वापरलेला ट्रक दडवून ठेवला होता. तो पोलिसांनी जप्त केला.एम. वाळूज पोलिसांचे एक पथक कबीर पठाण च्या साथीदारांच्या शोधात मुंबईला रवाना झाले आहे.
वरील कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, पी.एस.आय. चासकर, बाबासाहेब काकडे, दिपक मतलबे, सुधाकर सोनवणे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!