Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कोट्यावधी रु.च्या भूखंडावर धार्मिक स्थळ असल्याचा दावा, महिलेविरुध्द गुन्हा दाखल

Spread the love

पोलिस कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अनेक प्रकार घडल्याचे वरिष्ठ सूत्रांची माहिती

औरंगाबाद – जाफरगेट परिसरातील कोट्यावधी रुपयांच्या भूखंडावर धार्मिकस्थळ असल्याचा दावा करत व्यापार्‍याला त्रस्त करणार्‍या महिलेविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शाहिन भाभी उर्फ शाहिन पठाण असे या आरोपीचे नाव आहे. या महिलेने विनय प्रेमचंद सुराणा (५४) यांच्या भूखंडावर बनावट धार्मिकस्थळ उभारण्याचा प्रयत्न केला. या आरोपीला भूखंडावर उभ्या केलेल्या धार्मिकस्थळाबाबत कागदपत्रांची विचारणा केली.या भूखंडाचे कागदपत्रे वक्फ बोर्डाकडे असायला हवे असतांना तुझ्याकडे कसे ? अशी विचारणा केली असता. आरोपीने आपण कागदपत्रे घेऊन न्यायालयात दाद मागू पोलिसांवर तिचा विश्वास  नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलै.

महिलेची मोडस आॅपरेंडी

वरील महिला आरोपी शहरातील काही पोलिस कर्मचार्‍यांच्या मदतीने व्यापारी, डाॅक्टर, अशा लोकांना खंडणी मागण्याचे उद्योग करत असते. यापूर्वीही जिन्सी परिसरातील एका प्रकरणात १२लाख रु. पोलिसांच्या मदतीने हडपल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांना मिळाली असून त्यांची नावेही निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला असून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक उत्तम मुळंक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल सूर्यतळ करत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!