पुन्हा एकदा ” मी टू ” : या अमेरिकन अभिनेत्रीने हातावर गोंदवले लैंगिक छळ करणारांचे नाव…

Advertisements
Advertisements
Spread the love

महिला मग त्या कुठल्याही देशातल्या असोत , मनाविरुद्ध झालेल्या लैंगिक छळाविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उठविला आहे . सिने सृष्टीतील महिलांनी ‘# मी टू’ या मोहिमेअंतर्गत जगभर खळबळ उडवून दिली होती. अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनमुळे हा विषय गेले दोन वर्ष सातत्याने जगभर चर्चेत आहे. या चित्रपट निर्मात्याविरोधात आतापर्यंत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या यादित आता एमिली रॅटाकाउस्की हे आणखी एक नवे नाव जोडले गेले आहे.

Advertisements

भारतातही ‘# मी टू’ या मोहिमेमुमुळे अनेक सिने कलावंतांना , माध्यम क्षेत्रातील दिग्गजांना या मोहिमेचा सामना करावा लागला आहे . बऱ्याच जणांची प्रतिष्ठा त्यांच्यावरील आरोपांमुळे धुळीला मिळाली. आता पुन्हा आपल्या टॅट्यूमुळे एमिली रॅटाकाउस्की या वादाला तोंड फोडले आहे.

Advertisements
Advertisements

एमिली रॅटाकाउस्कीचे विशेष असे कि , जोपर्यंत हार्वे वेन्स्टिनला शिक्षा होत नाही तोपर्यंत तिने त्याच्या नावाचा टॅटू आपल्या हातावर गोंदवला आहे. एमिलीने हार्वे विरोधात लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. ती गेल्या अनेक महिन्यांपासून हार्वे विरोधात आवाज उठवत आहे. परंतु तिच्या आरोपांची नोंद कोणीही घेतली नाही. तसेच हार्वेने आरोप केलेल्या सर्व पीडित अभिनेत्रींना २५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स देण्याचे वचन दिले होते. या वचनाची त्याने अद्याप पूर्तता केली नाही. त्यामुळे तिने आता थेट हार्वेचे नावच आपल्या हातांवर गोंदवून घेतले.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अनकट गेम्स’ या चित्रपटाच्या प्रिमिअरमध्ये  एमिलीने स्वतःच  एका पत्रकारपरिषदेत तिने हातावर गोंदवलेला हा नवा टॅटू दाखवला. दरम्यान तिने हार्वे वेन्स्टिन विरोधात आपला संताप व्यक्त केला. गेल्या दोन वर्षात हार्वे विरोधात ४० पेक्षा अधिक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सोशल मीडियावरील ‘# मी टू’ या चळवळीची पहिली सुरुवात हार्वे विरोधातच करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा थेट परिणाम हार्वेच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही मोठय़ा प्रमाणावर झाला. सर्वात प्रथम त्याच्या घटस्फोटित पत्नीने त्याच्याविरोधात कौटुंबिक छळाचा खटला दाखल केला आहे.

दरम्यान  ऑस्कर पुरस्कार वितरित करणाऱ्या अ‍ॅकॅडमीच्या सदस्य पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली असून जोपर्यंत त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा निकाल लागत नाही  तोपर्यंत त्याला कंपनीच्या कोणत्याही पदावर घेतले जाणार नाही असे कंपनीने आधीच जाहीर केले आहेच पण त्याच्या ‘द वेन्स्टिन’ या कंपनीने निर्मिती केलेल्या कोणत्याही चित्रपटाला पुढील काही काळ ऑस्कर पुरस्कारांसाठी ग्राह्य़ धरले जाणार नाही. या एकामागून एक त्याच्या विरोधात घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे गेल्या काही दिवसांत त्याला काही कोटी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. विशेष म्हणजे ज्या कंपनीच्या जोरावर त्याने प्रतिष्ठा व आपले आर्थिक साम्राज्य उभारले त्याच कंपनीतील इतर सदस्यांनी त्याच्याविरोधात आता आर्थिक घोटाळ्यांचेही आरोप केल्यामुळे हार्वे पूर्णपणे बिथरला आहे.

आपलं सरकार