Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हौसेला खरेच मोल नसते मोल , एका नंबर प्लेटसाठी त्याने मोजले ६० कोटी तर या आधीही मोजले होते ४५ कोटी !!

Spread the love

काही लोकांच्या हौसेला खरेच मोल नसते . या हौसेखातर ते काहीही किंमत मोजायला तयार असतात. अशीच एक घटना दुबईत घडली आहे. गाड्यांच्या या शौकीनाने अप्लाय आवडत्या नंबरप्लेटसाठी  थोडे थोडके नाही तर ६० कोटी रूपये खर्च केले असल्याचे वृत्त आहे.

कारटॉकने दिलेल्या वृत्तानुसार, नंबरप्लेटसाठी ६० कोटी रूपये मोजणाऱ्या उद्योगपतीचे नाव आहे बलविंदर सिंह. त्यांनी ८० या स्पेशल नंबरमधून आपल्या लकी नंबरवर बोली लावली होती. बलविंदर  सिंह साहनी यांनी D5 नंबर निवडला होता. जो त्यांना  दुबई रोड अँड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी द्वारा आयोजित लिलावामध्ये मिळाला. ही बोली दुबई रोड अँड ट्रान्सपोर्ट अथॉरिटीच्या लिलावमधील सर्वात मोठी बोली होती. सोबतच जगात आतापर्यंतच्या सर्वात महागड्या रजिस्ट्रेशन नंबर्सपैकी एक आहे.

या लिलावमध्ये जवळपास ३०० लोकांनी बोली लावली होती. ज्यामध्ये ‘D5’ रजिस्ट्रेशन नंबरसाठी सर्वात जास्त बोली लावली होती. दुबईमध्ये अबू सबाह नावाने ओळखले जाणारे बलविंदर यांनी या स्पेशल नंबरसाठी तब्बल ३३ मिलियन दिरहम खर्च केले आहे. बलविंदर यांचं म्हणणं आहे की,  ‘९’  हा त्यांचा लकी नंबर आहे त्यामुळे हा नंबर खरेदी करण्यासाठी ही बोली लावली.

याआधीही बलविंदर यांनी स्पेशल नंबरप्लेटसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले आहे. दुबईमध्ये ०५ नंबर सुद्धा जिंकला होता. यासाठी त्यांनी जवळपास २५ मिलियन दिरहम (जवळपास ४५.३ कोटी) खर्च केले होते. बलविंदर यांचं म्हणणं आहे की, ‘यापुढेही जर अशा स्पेशल नंबरसाठी लिलाव आला तर आपण पुन्हा बोली लावणार आहे.’ बलविंदर यांच्या  कलेक्शनमध्ये तब्बल १०० हुन अधिक गाड्या आहे. यामध्ये Rolls Royce सह सर्वच महागड्या गाड्या आहेत. त्यांच्या गॅरेजमध्ये किती गाड्या आहे हे सांगण जरा कठीणच आहे. पण, असं सांगितलं जातं की,  बलविंदर सिंह साहनी यांच्याकडे एकूण 100 गाड्या आहे.

बलविंदर  सिंह  हे आर एस जी  इंटरनॅशनलचे मालक आहेत. जी एक प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनी आहे. ही कंपनी यूएई, कुवेत, भारत आणि अमेरिकेमध्ये  कार्यरत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!