Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jharkhand assembly results : भाजपला मोठा दणका, काॅंग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी

Spread the love

महाराष्ट्राला पाठोपाठ झारखंड मध्येही भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेससह मित्रपक्षांना बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे.

सकाळी ८ वाजता झारखंड विधानसभेच्या  निवडणुकीची  मतमोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असले तरी सुरूवातीच्या कलामध्ये भाजपा पिछाडीवर आहे. राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवलेला आहे.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस-जेएमएम आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई काळ दिसत होती. मात्र, काही मतमोजणीच्या फेऱ्या झाल्यानंतर ३२ जागांवर आघाडी घेतलेल्या भाजपाची घसरगुंडी उडाली आहे. भाजपा २७ जागांवर तर काँग्रेस-जेएमएमची वाटचाल पन्नाशीकडं सुरू झाली असून, सध्या ४३ जागांवर आघाडी घेतली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!