Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Updates : लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला

Spread the love

औरंंंगाबाद : तक्रारदाराच्या हॉटेलला लावलेला कर कमी करून देण्यासाठी ५ हजाराची लाच घेणार्‍या तलाठ्यास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रविवारी (दि.२२) गजाआड केले. दिलीप तुकाराम बावस्कर (वय ५३, रा. औरंगाबाद) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदाराचे फुलंब्री परिसरात हॉटेल असून या हॉटेलला महसूल विभागाने आकारलेला कर कमी करावा म्हणून तक्रारदाराने तलाठी दिलीप बावस्कर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी दिलीप बावस्कर यांनी कर कमी करण्यासाठी ५ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.

अ‍ॅन्टी करप्शनचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, जमादार गणेश पंडूरे, विजय बाम्हंदे, सुनील पाटील, दिगंबर पाठक, मिलिंद इपर, केदार कंदे, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून तलाठी दिलीप बावस्कर याला अटक केली.  बावस्कर याच्या ताब्यातून पोलिसांनी लाचेचे ५ हजार रूपये व हॉटेलच्या करापोटी घेतलेले ३ हजार ५०० रूपये असे एकूण ८ हजार ५०० रूपये जप्त केले आहेत.

वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, ट्रकसह तीन दुचाकी लंपास

औरंंंगाबाद : गेल्या काही महिन्यापासून वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून एका ट्रकसह तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. पठाण मुश्ताक पठाण नायब खॉ (रा.रहेमानीया कॉलनी) यांचा ट्रक क्रमांक (एमएच-४८-बीएम-०४४९) चोरट्यांनी २० डिसेंबरच्या रात्री मिसारवाडी येथून चोरून नेला. राहुल अशोक खरात (रा.संभाजी कॉलनी, सिडको एन-६) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईएम-३४८४) चोरट्याने ७ नोव्हेंबर रोजी संभाजी कॉलनी येथून चोरून नेली. अंकुश दुबळ्या चव्हाण (रा.नक्षत्रवाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीके-४६५०) चोरट्याने ९ डिसेंबर रोजी घराजवळून चोरून नेली. पोपट देवराव बनकर (रा.भारतनगर, हडको एन१३) यांची विनाक्रमांकाची नवीन दुचाकी चोरट्यांनी १२ डिसेंबर रोजी घराजवळून चोरून नेली. विविध भागातून ट्रक व दुचाकी वाहने लंपास करणार्‍या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिडको, सातारा आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत तरूण ठार

औरंंंगाबाद : भरधाव जाणार्‍या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या लखन रेवन सिध्दअप्पा (वय ३२, रा.सुन्नर, ता.कलबुर्गी, जि.गुलबर्गा) या युवकाचा मृत्यू झाला. लखन सिध्दअप्पा हा तरूण आपला मित्र प्रविण अशोक तळकेरे (रा.सुन्नर, ता.कलबुर्गी, जि.गुलबर्गा) याच्यासोबत २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी औरंगाबाद – पुणे महामार्गावरील वृंदावन हॉटेल येथे गेला होता. जेवण करून दोघे हॉटेलबाहेर येवून रस्ता ओलांडत असतांना पुण्याकडे जाणार्‍या भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत लखन सिध्दअप्पा याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक उंबरे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!