Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगरला २५ लाखाच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा

Spread the love

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा ठोठावताना कोर्टाने सेंगर याला पीडितेला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. सेंगरला कोर्टाने १६ डिसेंबरला भादंवि ३७६, पॉक्सो कायद्यातील कलम ५ (सी) अंतर्गत दोषी ठरवले होते. उन्नाव येथे २०१७मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार कुलदीपसिंग सेंगर दोषी असल्याचे स्पष्ट झाले.

हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी झाली. या प्रकरणी सेंगर व सहआरोपी शशी सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कुलदीपसिंग सेंगर उत्तर प्रदेशमधील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर चौथ्यांदा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आला. सेंगरने २०१७ मध्ये एका युवतीचे अपहरण केल्यानंतर कुलदीप सेंगरने पीडितेने बलात्कार केला होता. या घटनेवेळी पीडित युवती अल्पवयीन होती. बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने सेंगरला पक्षातून निलंबित केले. ऑगस्टमध्ये सेंगर आणि सहआरोपी शशी सिंह  यांच्या विरोधात गुन्हेगारी कट, अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते.

दरम्यान पीडित युवतीच्या कारला २८ जुलै रोजी एका ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात पीडित युवती गंभीर जखमी झाली होती. मात्र, या अपघातात पीडितेचे दोन नातेवाईक ठार झाले होते. या अपघातानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी या अपघातामागे सेंगरचा कट असल्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टाने उन्नाव बलात्कार प्रकरणी दाखल सर्व पाच प्रकरणे लखनऊ कोर्टातून दिल्लीतील कोर्टात वर्ग केली होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!