Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : मे महिन्यात झालेल्या खून प्रकरणात शर्टच्या एका बटनावरून आरोपीपर्यंत कसे पोहोचले पोलीस ?

Spread the love

सिल्लोड-बदनापुर येथे लुटमारी करणारे तिघे गजाआड । १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त । ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई


औरंंंगाबाद : सिल्लोड, बदनापूर येथील विदेशी दारूचे दुकान रात्री बंद करून दिवसभरात जमा झालेली रक्कम घेऊन जाण्याच्या हालचालींवर पाळत ठेवून हल्ला करून लुटमारी करणा-यांची टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने गजाआड केली. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी १ लाख १५ हजार रूपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस  अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी (दि.१८) पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या टोळीने लुटमारी करतांना सिल्लोड येथे एकाचा निर्घृण  खून केला असल्याची माहिती तपासात समोर आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय गुलाबराव रगडे (रा.सातारा परिसर,औरंगाबाद), संदीप आसाराम गायकवाड (रा.परतुर,जि.जालना), चेतन अशोकराव गायकवाड (रा.सिल्लोड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिल्लोड येथील लक्ष्मण मोरे हे देशी-विदेशी दारूच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. १२ मे २०१९ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास लक्ष्मण मोरे व भिकन निळुबा जाधव हे दोघे दुकान बंद करून जात असतांना त्यांच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी लावून त्यांच्या हातातील ४ लाख रूपयांची बॅग लुटारूंनी लांबवली होती. लुटमारी करणा-यांनी केलेल्या हल्यात भिकन जाधव यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे, उपनिरीक्षक भगतसिंह दुलत, संदीप साळुंके, सहाय्यक फौजदार सुधाकर दौड, जमादार विठ्ठल राख, नामदेव शिरसाट, सुनिल खरात, संजय भोसले, शेख नदीम, विनोद तांगडे, ज्ञानेश्वर मेटे, गणेश गांगवे, योगेश तरमळे, जिवन घोलप आदींच्या पथकाने लुटमारी करून खून करणा-यांच्या मुसक्या आवळल्या.


लुटमारी दरम्यान केला खून
अटकेत असलेल्या चोरट्यांनी १२ मे २०१९ रोजी सिल्लोड येथे वाईनशॉपच्या कर्मचा-यांवर हल्ला करून ४ लाख रूपयांची बॅग लंपास केली होती. या लुटमारीदरम्यान चोरट्यांनी भिकन निळुबा जाधव याचा निर्घृण खून केला होता. या खूनाच्या गुन्ह्याचाही उलगडा पोलिसांनी केला.


शर्टाच्या बटनावरून लागला शोध
सिल्लोड येथे लुटमारी दरम्यान झालेल्या खूनाचा शोध लावतांना पोलिसांना रोप लास्ट स्टिच असे इंग्रजीत नाव लिहिलेले शर्टाचे बटन सापडले होेते. या शर्टाच्या बटनावरील नावावरून पोलिसांनी २४६ जणांची तपासणी करीत अजय रगडे याला अटक केली. अजय रगडे याने फ्लिपकार्ट वरून शर्ट आणि दोन चाकू  ऑनलाईनरित्या मागविले होते अश्ीा माहिती मोक्षदा पाटील यांनी यावेळी दिली.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!