Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak Helpline : ३१ डिसेंबरच्या आत आयटीआर भरा अन्यथा होऊ शकतो तुम्हाला मोठा दंड , टॅक्स रिफंडसंदर्भात खोटे ईमेल आणि SMSच्या लिंकवर क्लिक करूच नका

Spread the love

आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख  ३१  डिसेंबर आहे. या मुदतीत तुम्ही आपले ITR Return भरले नाही, तर किमान 5000 रुपयांचा दंड लागणार आहे.  अंतिम मुदत जवळ आल्याच्या अगदी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळायची असेल तर लवकरात लवकर ITR भरणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे नव्या नियमानुसार तुम्ही जर नव्या वर्षात म्हणजेच ३१ डिसेंबर ते मार्च २०२० पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर तुम्हाला १० हजारांचा भुर्दंड भरावा लागणार आहे. तुमचे  उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरीही तुम्हाला हा दंड भरावा लागणार आहे.

ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फॉर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.

दरम्यान आयकर विभागाने सर्व करदात्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार आयटी विभागाकडून येणाऱ्या खोट्या मेसेजपासून सावध राहण्याचे  आवाहन करण्यात आले आहे. काही लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसंदर्भात खोटे ईमेल आणि SMS येतात. मेसेजमध्ये लिहिले आहे  की, असा मेसेज येतो ज्यात एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करून टॅक्स रिफंड मिळेल, असं लिहिलं असतं. Url http://151.80.90.62/ITRefund असंही दिलं असतं. पण आयकर विभागानं म्हटलंय की यावर चुकूनही क्लिक करू नका. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं असा सावधानतेचा इशारा आयटी विभागाकडून देण्यात आला आहे.

इन्कम टॅक्स विभागाने कर भरणाऱ्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. करदाते ई फायलिंगच्या माध्यमातून रिटर्न फाइल करू शकतात. ही सर्व्हिस https://www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत पोर्टलवर सुरू आहे. याला e-filing Lite सुविधा असं नाव देण्यात आलं आहे. ३१ ऑगस्टच्या डेडलाइनपर्यंत ITR भरला नाही तर त्यासाठी दंड भरावा लागेल. जर तुम्ही १ जानेवारी २०२० पासून ३० मार्च २०२० पर्यंत ITR भरला तर १० हजार रुपये दंड भरावा लागेल. ज्यांचं उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना उशिराचा दंड म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!