Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CCA : तुम्ही कितीही विरोध करा , सरकार या कायद्याची अंमलबजावणी करणारच : अमित शहा यांनी विरोधांना सुनावले

Spread the love

मोदी सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशभरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून या कायद्याच्या विरोधात दिल्ली आणि परिसरात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरु आहेत. या घटनांवरुन विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत  पकडण्याचे प्रयत्न सुरु केले असले तरी “तुम्ही कितीही विरोध करा, सरकार या कायद्याची अंमलबजावणी करणारच,” असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.

दक्षिण दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले की, “तुम्हाला पाहिजे तितका राजकीय विरोध करा पण नरेंद्र मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. तसेच मी त्या लोकांना हे निश्चितपणे सांगू इच्छितो जे इतक्या वर्षांपासून भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या आपल्या अधिकारांपासून वंचित राहिले आहेत, त्यांना ते दिले जाईल.” गृहमंत्र्यांनी विरोधकांना हे आव्हान दिले त्याचवेळी पूर्व दिल्लीच्या सीलमपूरमध्ये शेकडो लोक नागरिकत्व कायद्यातील बदलांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. काही वेळातच आंदोलक हिंसक बनले आणि त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. त्यानंतर त्यांना पळवून लावण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून प्रत्युत्तर द्यावे लागले.

दरम्यान, शाह काही तासांपूर्वीच दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाले होते की, सर्व विरोधक लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हे समजावण्याचा प्रयत्न केला की, सुधारित नागरिकत्व कायद्याद्वारे कोणत्याही अल्पसंख्यांक व्यक्तीचे नागरिकत्व परत घेण्यात येणार नाही. या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!