डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर  शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठी -हिंदी सिने आणि नाट्य अभिनेते  डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर  शुक्रवारी शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शासनाच्या वतीने देण्यात आली आहे .

Advertisements

डॉ. श्रीराम लागू यांचे काल मंगळवारी निधन झाले.  ‘लागू यांचे चिरंजीव आनंद अमेरिकेत आहेत. ते आल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील,’ असे लागू कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आनंद गुरुवारपर्यंत पुण्यात पोहचू शकत नसल्याने लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम आणि कन्या डॉ. शुभांगी कानिटकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. लागू यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी काढले. उपसचिव उमेश मदन यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांना पत्राद्वारे तशी सूचना केली आहे. दरम्यान, लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत ठेवले जाणार आहे. लागू निरीश्वरवादी होते. त्यामुळे धार्मिक विधी होणार नाहीत, असे लागू यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

आपलं सरकार