Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्याचे आदेश

Spread the love

टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी लवादाने दिली आहे. त्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा टाटा सन्सच्या चेअरमनपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सायरस मिस्री यांची या पदावरून तीन  वर्षांपूर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. या लवादाने सायरस मिस्री यांना हटवण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला असून त्यांच्या जागी एन. चंद्रशेखरन यांची झालेली नियुक्तीही कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे.

सायरस मिस्री हे टाटा सन्सचे सहावे चेअरमन होते. २०१६  साली काही नाट्यमय घडामोडींनंतर सायरस मिस्री यांना या पदावरून हटवण्यात आलं. रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर चेअरमन झालेले सायरस मिस्री यांनी २०१२ ते २०१६ अशी ४ वर्षं कार्यभार सांभाळला. त्यांच्यानंतर TCS चे सीईओ एन. चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा सन्सची जबाबदारी सोपवण्यात आली.

दरम्यान सायरस मिस्री यांनी आपल्या हकालपट्टीला कोर्टात आव्हान दिले होते . सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टर्लिंग इनव्हेस्टमेंट कॉर्प या कंपन्यांच्या माध्मयातून त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादाकडे दाद मागितली होती. सायरस मिस्री यांना हटवण्याचा निर्णय कंपनीच्या कायद्यानुसार नव्हता, असे  या कंपन्यांचे  म्हणने  होते  पण २०१८  मध्ये राष्ट्रीय कंपनी लवादाने हे दावे फेटाळून लावले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!