Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

येत्या चार महिन्यात अयोध्येतील राम मंदिर उभे करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रचार सभेत जाहीर घोषणा

Spread the love

येत्या चार महिन्यात राम मंदिराची निर्मिती करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. येत्या चार महिन्यात आकाशाला गवसणी घालणारं भव्य राम मंदिर उभारलं जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. झारखंड येथील प्रचारसभेत अमित शाह यांनी ही घोषणा केली.

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात भव्य राम मंदिर उभारु अशी घोषणा मी करतो आहे” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर राम मंदिराचं प्रकरण काँग्रेसने प्रलंबित ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने मात्र हे प्रकरण मार्गी लावलं. इतरही प्रकरणं मार्गी लावली.

झारखंड येथील पाकुडमध्ये अमित शाह यांची सभा झाली. त्या सभेत अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. वादग्रस्त जागेसंदर्भातला निर्णय चर्चेतून सुटावा असं आम्हाला वाटत होतं. मात्र चर्चा निष्फळ ठरली, तेव्हा न्यायालयाने रोज सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तो सर्वांसमोर आहे असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!