Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंडित नेहरूंच्या विरोधात पोस्ट करणे या अभिनेत्रीला पडले महागात , पोलिसांनी केले गजाआड

Spread the love

स्वतःला रामभक्त हिंदू म्हणवून घेणारी आणि अलीकडच्या काळात सोशल मीडियावर सतत वादग्रस्त पोस्ट टाकणारी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला आज (रविवार) सकाळी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत खुद्द पायलने एक ट्वीट केले आहे. दुसरीकडे, राजस्थानातील बूंदी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘बूंदीच्या पोलिस अधीक्षक ममता गुप्ता यांनी सांगितले की, पायल हिला अटक केली असून तिला बूंदी येथे हलवण्यात येणार आहे. पायल हिने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पायलला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

आपल्या अटकेबद्दल पायलने  पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला हि माहिती देणारी  पोस्ट टॅग करुन ट्विटरवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ केल्यामुळे मला राजस्थान पोलिसांनी अटक केली. मी सांगितलेली माहिती गूगलवरुन घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करीच झाली आहे’, असे पायलने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पायल रोहतगीने आपल्या पोस्टमध्ये  म्हटले होते  कि , ‘मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो मला आत्ताच समजला. जेव्हा महाराज हरी सिंह यांनी शेख अब्दुल्ला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं, तेव्हा त्यांचे वकील पंडित जवाहरलाल नेहरु होते, असं म्हटलं जातं. ही गोष्ट खरी आहे की खोटी? जर खरी असेल, तर जवाहरलाल नेहरु यांचं देशद्रोही वर्तन आता मला समजतं’.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!