Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जनधन खात्यात ५० पैसे थकबाकी ? बँकेने ग्राहकाला खेचले न्यायालयात , नायायाधीशही झाले अवाक !!

Spread the love

राजस्थानातील झुंझुनूं येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या (एसबीआय) एका शाखेने आपल्या एका ग्राहकाला केवळ ५० पैशांसाठी नोटिस बजावली आहे. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. विनोद सिंह यांनी सांगितले की, केवळ ५० पैशांसाठी बॅंकेने मुलाला नोटिस बजावली आहे. एवढेच नाही तर बॅंकेचे अधिकाऱ्यांनी तगादा लावला आहे. आता बॅंकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याप्रमाणे अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे जितेंद्र यांचे वकील विक्रम सिंह यांनी सांगितले आहे.

राजस्थानच्या खेतडी येथील लोकन्यायालयात शनिवारी हे प्रकरण समोर आले तेंव्हा ५० पैशांसाठी ग्राहकाला बॅंकेने बजावलेली नोटिस पाहून न्यायाधिशही थक्क झाले. जितेंद्र कुमार असे नोटिस बजावण्यात आलेल्या ग्राहकाचे नाव आहे. जितेंद्र कुमार यांनी एसबीआयच्या शाखेत जनधन खाते उघडले आहे. या खात्यात १२४ रुपये जमा आहेत. तरी देखील बॅंकेने १२ डिसेंबरला रात्री ११ वाजता जितेंद्र यांच्या घरी एक नोटिस पाठवली. जितेंद्र कुमार यांच्याकडे ५० पैसे थकबाकी असून त्यांनी ती त्वरीत भरावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिसद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, खेतडी येथे शनिवारी लोकन्यायालय आहे. तिथे हजर होऊन थकबाकी असलेले ५० पैसे जमा करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, ग्राहक जितेंद्र यांच्या ऐवजी त्यांचे वडील विनोद सिंह खेतडी येथील लोकन्यायालयात पोहोचले. जितेंद्र यांच्या मणक्यांचा त्रास असल्याने ते येऊ शकले नाही, असे त्यांनी लोकन्यायालयात सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!