Aurangabad : साहील सोनार यांच्या “लाईव्ह इन् कन्सर्ट” चे आज आयोजन

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद शहरात आज  रविवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता तापडिया नाट्य मंदिर येथे “साहील सोनार लाईव्ह इन् कन्सर्ट ” या म्यूझिक अँड सॉंग्स विथ रेट्रो साँग चे १०० व्या प्रयोगाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

Unplug ही थीम घेऊन तयार करण्यात आलेल्या या कन्सर्ट मध्ये साहील सोनार हा जुन्या व नव्या हिंदी तसेच वेस्टर्न गीते सादर करणार आहे साहिल सोनार यांचे पुणे मुंबई व औरंगाबाद येथे शो होत असतात. त्यांना युवा वर्गातून प्रचंड पसंती आहे यूट्यूब चॅनल वर देखील साहिल सोनार यांचे अनेक फॉलोअर्स आहेत त्यांना लहानपणापासूनच गिटार वाजवणे तसेच गायनाचा छंद आहे. औरंगाबाद येथील विवेकानंद अकॅडमी या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व एमआयटी महाविद्यालयात पॉलिटेक्निक ही पदवी प्राप्त केली आहे.

Advertisements
Advertisements

या शो मध्ये मुंबई येथील युवा गायिका शिखा सोनिक , क्षितिज ढगे सिंथेसायझर , रोहित गायकवाड गिटार, आर्या साळवी ड्रम, सुमित पगारे बेस गिटार, ललित चोबे परकशन, निखिल प्रधान ढोलकी, प्रीतीश भोपे सिंथेसायझर, लाईट्स सतीश म्हस्के, रंगमंच व्यवस्था जाधव मंडप, हे सहकार्य करणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव मालपाणी , हर्ष झवेरी, कुणाल बाकलीवाल, सागर सोनार , आरती सोनार, संजीव सोनार संदीप सोनार हे परिश्रम घेत आहेत.

आपलं सरकार