Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पॅन कार्ड, आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही , बांगला देशी महिलेला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Spread the love

‘पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा सेल डीड आदी दस्तावेज कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही असं सांगत मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं एका ३५ वर्षीय बांगलादेशी महिलेला भारतात अवैधपणे प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. तिला न्यायालयानं एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईच्या दहिसर पूर्व मध्ये राहणारी महिला ज्योती गाझी उर्फ तस्लिमा रबिउल या महिलेला भारतातील बेकायदा वास्तव्याबद्दल न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने तिला अवैधरित्या भारतात प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. न्यायालयानं निकाल देताना हे स्पष्ट स्पष्ट केले आहे कि , ‘पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा सेल डीड आदी दस्तावेज कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही . सर्वसाधारणपणे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जन्मदाखला, जन्म ठिकाण, आई-वडिलांचं नाव, जन्माचे ठिकाण आणि नागरिकत्वाचा पुरावा असणे गरजेचे आहे. अनेकदा आजी-आजोबांच्या जन्माचं ठिकाणही ग्राह्य धरलं जातं, असे  न्यायालयाने  म्हटले आहे.

दरम्यान नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणांमध्ये आपण विदेशी नागरिक नाही हे सिद्ध करण्यासाठी आरोपींना पुरावे किंवा दस्तावेज सादर करणे बंधनकारक असते, अशी टिप्पणी न्यायालयाने  हा निकाल देताना केली. मी बांगलादेशी असून, १५ वर्षांपूर्वी मुंबई शहरात आली होती, असा दावा रबिउलनं केला होता. त्यावर रबीउल ही बांगलादेशी नागरिक आहे आणि तिने  वैध पासपोर्ट किंवा दस्तावेज नसताना भारतात प्रवेश केला आहे, हे आधीच सिद्ध झालं आहे, असेही न्यायालयाने  म्हटले  आहे. तत्पूर्वी, रबीउल ही एक महिला आहे म्हणून सूट दिली जावी, हा युक्तिवादही न्यायालयानं फेटाळून लावला. ‘जर अशा प्रकारे सूट दिली तर राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर गदा येऊ शकते, कारण अशा बेकायदा नोंदींमुळे  विदेशी हे भारतीय अर्थव्यवस्थेला मारक ठरू शकतात,’ असे  मतही न्यायालयानं व्यक्त केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!