Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Hyderabad Encounter News Update : सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी , माजी न्यायाधीशांमार्फत चौकशीचा प्रस्ताव

Spread the love

हैदराबाद चकमकीप्रकरणी सर्वोच्च नायायालयात बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने  म्हटले आहे की, हैदराबाद चकमकीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी गुरुवारी होईल. कोर्टाचे म्हणणे आहे की, तेलंगाना उच्च न्यायालय आधीपासूनच या प्रकरणात सामील आहे. म्हणूनच  सर्वोच्च न्यायालयाच्या  माजी न्यायाधीशांमार्फत हि चौकशी होईल, जे दिल्लीत राहूनच या घटनेची चौकशी करतील.

मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी अधिवक्ता जी.एस. मणी यांच्या विनंतीची  दखल घेतली होती. या चकमकीत सामील असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात स्वतंत्र तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी होणे आवश्यक असल्याचे मणी यांनी म्हटले होते.

अशाच प्रकारची याचिका दुसरे वकील मनोहर लाल शर्मा यांनीही दाखल केली होती. शर्मा यांच्या याचिकेत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची चौकशी केली पाहिजे. या चकमकी बनावट असल्याचा दावा मणी आणि वकील प्रदीपकुमार यादव यांनी याचिकेत केला असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करावी.

दरम्यान तेलंगणा उच्च न्यायालयाने चारही आरोपींचे मृतदेह शुक्रवार १३  डिसेंबरपर्यंत संरक्षित ठेवण्याचे आदेश आधीच दिले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालय उद्या दि. १२ रोजी पुढील सुनावणी करणार आहे. या शिवाय या चकमकीच्या चौकशीसाठी तेलंगणा सरकारनेही  एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीचे अध्यक्ष राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम भागवत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!