CAB : नागरिकत्व सुधारणा विधयेक राज्यसभेतही पास झाल्याने मोदींनी आनंद व्यक्त करीत मानले आभार

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा  विधेयक १२५ विरुद्ध १०५ मतांनी मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला असून भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Advertisements

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. १९५५ मधील नागरिकत्व विधेयकात दुरुस्ती करण्यात आल्याने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या विविध ६ धर्मीय निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावरच बोट ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंधुभाव आणि दयेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक पास झाल्याने मी आनंदी आहे. या विधेयकाच्या बाजूने ज्या सदस्यांनी मतदान केले त्या सर्वांचे मी आभार मानत आहे. जे निर्वासित वर्षानुवर्षे यातना सहन करत आहेत, त्यांची यातना हे विधेयक दूर करणार आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आपलं सरकार