Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Cyber Crime : कॅशबॅकचे आमिष दाखवून भामट्याने लांबविले विद्यार्थिनीचे ३ लाख २१ हजार रूपये

Spread the love

औरंंंगाबाद : आमच्या कंपनीच्या  सेफ गोल्ड स्कीममध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास चांगला कॅशबॅक मिळेल असे आमिष दाखवून भामट्याने बीएसएस्सी तृतीय वर्षात शिकणा-या विद्यार्थीनीस ३ लाख २१ हजार ५८९ रूपयांचा चुना लावला. भामट्याने विद्यार्थीनीस चुना लावल्याचा प्रकार ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ या काळात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २१ वर्षीय तरूण आपल्या बहिणीसह शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात वास्तव्यास आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण  घेणा-या  त्या तरूणाचे समर्थनगर परिसरातील एसबीआय बँकेत खाते असून बँकेत त्याने आपल्या शिक्षणासाठी ३ लाख ८४ हजार ९९९ रूपये फिक्स डिपॉझीट केले आहेत. दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी तक्रारदार तरूण ३० नोव्हेंबर रोजी आपल्या मोबाईलमध्ये फोन-पे हे अ‍ॅप डाऊनलोड करीत होता. त्यावेळी तक्रारदार युवकाच्या मोबाईलवर ८५२१६१९५४६ या क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपले नाव मनोज असे सांगून फोन-पे च्या सेफ गोल्ड स्किममध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा तसेच कॅशबॅक मिळेल असे आमिष दाखविले. त्यानंतर तक्रारदार तरूणाने फोन-पे वर आलेल्या नोटीफिकेशन वरून सेफ गोल्ड स्किमसाठी ९९९ व ४९९ रूपयांचे ट्रांजेक्शन केले होते. परंतु त्याला कोणतेही कॅशबॅक आले आहे.
दरम्यान, ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या काळात भामट्याने वेळोवेळी विविध प्रकारे तक्रारदार युवकाच्या खात्यातून पैसे लंपास करण्यास सुरूवात केली. तक्रादार युवकाने मनोज नावाच्या व्यक्तीशी संपर्क  साधुन मला पैसे गुंतवायचे नाही असे सांगुन पैसे परत मागितले होते. त्यानंतरही भामट्याने त्याच्या खात्यातून पैसे काढुन घेत ३ लाख ९७ हजार ५८९ रूपयांचा गंडा घातला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार युवकाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून भामट्याविरूध्द तक्रार दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!