Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कुंटणखान्यात ग्राहक पुरविणाऱ्या अटकेतील दलालांच्या पोलिस कोठडीत वाढ

Spread the love

औरंंंगाबाद : बीड बायपास रोडवर सुरू असलेल्या दोन कुंटणखान्यांवर ७ डिसेंबर रोजी पोलिसांनी छापा मारुन प्रत्येकी चार दलाल व ग्राहकांना पकडले होते. प्रकरणात दलालांना ग्राहक पुरविणा-या मनोज गोविंदराव जाधव (वय ४०, रा. दहीहंडे गल्ली, चिकलठाणा) या एजंटला देखील पोलिसांनी बुधवारी (दि. ११) रात्री गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता शुक्रवारपर्यंत (दि. १३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) दिले.

बीड बायपास रोडवरील राजेशनगर आणि यशवंतनगर भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा मारुन राजेशनगर व यशवंतनगरातील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये कोलकाता आणि हैदराबाद येथील तीन वारांगणा व गारखेडा परिसरातील एका वारांगणेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच चार दलाल व चार ग्राहकांना देखील पोलिसांनी अटक केली. छाप्यात पोलिसांनी दारुसह इतर साहित्य असा सुमारे एक लाख ७४ हजार ७०५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिस कोठडी दरम्यान अटकेत असलेल्या दलालांनी आरोपी मनोज जाधव हा ग्राहक आणत असल्याची माहिती पोलिसांना दिली. प्रोझोन मॉलचा अधिकारी महंमद अर्शद व अमोल शेजूळ या दोघा ग्राहकांना देखील मनोजनेच आणल्याची माहिती देखील त्यांने दिली.


मनोजच्या मोबाईलमध्ये अनेकींचे फोटो
मनोज जाधव याला अटक केल्यावर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. मनोज जाधव हा त्याच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांना देहविक्री करण्यासाठी आलेल्या महिलां व तरूणींचे फोटो पाठवत होता. त्यानंतर ग्राहकांना मनोज वुंâटनखान्यापर्यंत आणत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!