बिहारमध्ये गर्भवती मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Advertisements
Advertisements
Spread the love

बिहारमध्ये एका गर्भवती मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात मुलगी ८० टक्के भाजली, तिच्यावर बेतिया हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी लैंगिक छळाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Advertisements

देशभरातील महिलांच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली असतांनाच, बिहारमधील पश्चिम चंपारणच्या शिकारपूर या ठिकाणी एक महिन्याच्या गर्भवती मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला त्यात ती ८० टक्के भाजली आहे. या गंभीर अवस्थेत तिला बेतिया येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अरमान नावाच्या एका मुलाने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. अरमान सोबत मुलीचे प्रेम संबंध होते. मुलगी एका महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे तिने अरमानवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. अरमानने लग्न करण्यास टाळाटाळ केली. तिने मागणी करूनही त्याने तिच्यासोबत लग्न केले नाही. उलट, अरमानने मंगळवारी सकाळी घरात घुसून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, असे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना मुलीला जाळण्यामागे आणखी दुसरा काही तरी हेतू असल्याचा संशय आहे. कारण, या दुर्दैवी घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची सूचना केली नाही. मुलगी ८० टक्के भाजली असताना तसेच पोलिसांना याची माहिती देण्याची तसदी कुटुंबीयांनी घेतली नाही. तसेच घटनास्थळी सर्व साफ केल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी कुटुंबीयाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिकतेचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल व त्याची कसून चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आपलं सरकार