हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी तेलंगणा सरकारकडून एसआयटी , आयपीएस महेश भागवत करणार चौकशी

Advertisements
Advertisements
Spread the love

हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून पोलिसांना आता अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. सायबराबाद पोलिसांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केली आहे. तेलंगणा पोलिसांची प्रतिष्ठा या प्रकरणात पणाला लागल्याने हे प्रकरण आता चर्चेच्या केंद्र स्थानी आलंय. त्याचबरोबर या प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू असल्याने सगळ्यांचे  लक्ष कोर्टाच्या आदेशाकडे असणार आहे. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचे संकेत दिले आहेत. तर राज्य सरकारने ज्येष्ठ आयपीएस  अधिकारी महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली आहे.

Advertisements

हैदराबादेतील एका महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी नेवून पोलिसांनी नेमकं काय झालं ते समजून घेताना त्या सर्व आरोपींचे  एन्काउंटर करण्यात आले  होते. दरम्यान  आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे हे एन्काउंटर घडले  असा दावा पोलिसांनी केला होता. तर अनेक व्यक्ती या संघटनांनी यावर संशय व्यक्त केला आहे.

Advertisements
Advertisements

तपास अधिकारी महेश भागवत हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे आहेत. पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांची युपीएससीच्या माध्यमातून आयपीएस  मध्ये निवड झाली. १९९७ ला मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये त्यांची सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नंतर ते आंध्र प्रदेशात आले. २०१६ पासून ते तेलंगणातल्या राचकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. माओवाद्यांविरुद्ध कारवाई करत त्यांना शरण आणणं, मानवी तस्करी रोखण्यासाठी उपाय योजना करणं अशी अनेक धडाडीची कामे त्यांनी केली आहेत. या कामांमुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

आपलं सरकार