Crime News Update : बालवाडीतल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून खून , आरोपीला अटक , गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप

Spread the love

नागपूरनजीकच्या कळमेश्वरमध्ये रविवारी एका पाच वर्षीय चिमुकलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती . शव विच्छेदन अहवालात तिच्या तोंडात कापड कोंबून पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. नंतर दगडाने डोके ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचा वैद्यकीय अहवाल येताच या घटनेचे तीव्र पडसाद कळमेश्वरमध्ये उमटले आणि वातावरण  तणावपूर्ण झाले. पाचवर्षीय चिमुकली जिल्हा परिषद शाळेत बालवाडीला होती.

दरम्यान या चिमुकलीच्या हत्येची घटना उघडकीस येताच संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली. शेकडो गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी पोलिसांविरोधात घोषणात देत काळे झेंडे दाखविले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या संतप्त जमावाला समजावता समजावता पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले.  मुलीच्या हत्येनंतर संतप्त गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घातला होता. ‘मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, नराधमाला फाशी द्या’, अशा आशयाची फलके गावकऱ्यांच्या हातात होती. शेकडो गावकरी जमल्याने तणाव निर्माण झाला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक कळमेश्वर येथे मागविण्यात आली होती.  दरम्यान, काही गावकऱ्यांनी सायंकाळी कॅण्डल मार्चही काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पाच वर्षांपूर्वी मुलीचे वडील मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात कळमेश्वर येथे आले. ते मजुरी करतात. कळमेश्वरनजीकच्या गावात मुलीचे आजोबा राहातात. दोन्ही गावांना जोडण्यासाठी शेतातून एक रस्ता गेला आहे. शुक्रवारी मुलगी शाळेतून घरी आली. आजोबांकडे जात असल्याचे सांगून ती घरून निघाली व आजोबाकडे गेली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आजोबांकडून घरी जाण्यासाठी निघाली. मात्र, घरी पोहोचली नाही. रात्र होऊनही ती घरी न आल्याने मुलीच्या नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. ती सापडत नसल्याने  नातेवाइकांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.

रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना नागपुरातील संजय भारती यांच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. तिच्या तोंडात कापड व काड्या कोंबण्यात आल्या होत्या. या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांनी पोलिसांविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत आदींसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला. आणि शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नराधम संजय पुरी याला अटक केली आहे. तो शेतमजुरी करतो. दारू पिऊन त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून सकाळीच नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कळमेश्वरकडे धाव घेतली. नराधमाचा तत्काळ  शोध घेण्यासाठी काढण्यासाठी ओला यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या काही तासांताच पोलिसांनी संजयला पकडले. या प्रकरणात आणखी दोन जणांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

आपलं सरकार