Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : जयभीम आर्मीच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा मागितल्याचा आरोप , दोघांविरुद्ध गुन्हा

Spread the love

औरंगाबाद –  जिल्हापरिषदेतील महिला कर्मचार्‍याला दोन लाख रु खंडणी मागितल्यावरून दोघांविरुद्ध  क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जयभीम आर्मीचा उपाध्यक्ष आनंद भुतेकर आणि महिला कार्यकर्ता कुसुम वाहुळे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  मीना विठोरै या जिल्हापरिषदेतील महिला व बालकल्याण विभागात सुपरवायझर म्हणून काम करतात. २०१३ साली आधारकार्ड तयार करण्याचे काम विठोरे यांना लाडसावंगी परिसरात देण्यात आले होते. त्यावेळी आधारकार्डासाठी विठोरे पैशाची मागणी करतात  असा ठपका विठोरेंवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्यांची जिल्हापरिषदेकडून चौकशी झाली हौती. त्यामधे विठोरे  निर्दोष असल्याचे सिध्द झाले होते पण अचानक २ डिसेंबर रोजी जयभीम आर्मीतर्फे मीना विठोरेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी  जिल्हापरिषदेबाहेर उपोषण सुरु झाले होते.

या प्रकरणात पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे विठोरे यांनी म्हटले आहे कि , या उपोषण कर्त्यांनी त्यांच्याकडे प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाख रु.द्या असा तगादा लावला. या घटनेचा विठोरे यांच्या मुलाने व्हिडीओ तयार करुन तो क्रांतीचौक पोलिसांकडे दिला. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला .  पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीचौक पोलिस अधिक तपास करीत आहेत .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!