नागरिकत्व विधेयक : शिवसेनेचे राजकारण संधीसाधू… – ओवेसी

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करत सेनेने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांनी सेक्युलर हा शब्द त्यांच्या किमान समान कार्यक्रमात लिहिला. मात्र हे बिल धर्मनिरपेक्षतेविरोधात आहे. त्यामुळेच शिवसेनेने या विधेयकावरुन त्यांचे भांगडा पॉलिटिक्स सुरु आहे अशी टीका एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. शिवसेनेचे राजकारण हे संधीसाधू आहे अशीही टीका त्यांनी केली.

Advertisements

नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत बहुमताने मंजुर झाले, यावेळी शिवसेनेनेही याला पाठींबा दिला होता. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले, नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे असल्याने शिवसेनेने त्याला पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisements
Advertisements

“राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला असल्याचेही म्हणाले होते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आम्हाला कोणी काय करायचं ते शिकवू नये असे म्हटले होते. तसेच नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मात्र ओवेसी यांनी शिवसेना भांगडा पॉलिटिक्स करत असल्याची टीका केली आहे.

आपलं सरकार