Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खळबळजनक : “त्याने” पत्नीच्या देहाचे तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवले आणि आर्धा भाग जाळण्याचा केला प्रयत्न , आरोपी गजाआड

Spread the love

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील अशोकनगर भागात पतीनेच घरात पत्नीची नऊ दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करून तिच्या देहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान आरोपी पतीने सोमवारी कमरेपासून वरचा उरलेला अर्धवट सांगाडा नाल्याच्या काठावर जाळून नष्ट करण्याचा प्रयत्नं केला खरा पण अर्धवट जळलेल्या सांगाडयामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. सोमवारी सकाळी  नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगडा आढळून आल्यानंतर  पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून तपास लावला.

या प्रकरणात हत्या झालेल्या विवाहितेची नाव रेश्मा संजय साळवे असे असे असून तिची हत्या करणाऱ्या पतीचे नाव संजय रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहमान असे  असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने  फ्रीजमध्ये ठेवलेले रेश्माच्या शरीराचे इतर तुकडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.  या घटनेने माजलगाव शहर हादरून गेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार आरोपी संजय काही काम करत नाही, यावरून पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होते. १९ नोव्हेंबरला दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यातून संतापलेल्या संजयने हे टोकाचे पाऊल उचलले. मृत रेश्मा हिने २६ नोव्हेंबर रोजी माझ्यासह मुलांना पतीपासून धोका असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर रेश्माला आपला प्राण गमवावा लागला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

माजलगाव शहरात अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व रेश्मा पठाण यांचे कॉलेज जीवनापासून प्रेम होते. त्यांनी घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. संजय याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने रहात होता. या दाम्पत्यास एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहे. पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी या प्रकरणात तातडीने तपास करून  संजय साळवे यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्यातून त्याने आठ दिवसांपूर्वी (30 नोव्हेंबर) रेश्मा कत्तीने हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले. घरात दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी फ्रीज उघडून पाहिले असता रेश्माच्या शरीराचे कमरेखालील भागाचे तुकडे आढळून आले. शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!