Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“ती ” पतीला वाचविण्यासाठी मदतीची याचना करीत होती आणि “बघे” व्हिडीओ काढण्यात मग्न होते….

Spread the love

रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीला  भर दिवसा पत्नीसमोर गोळ्या घालण्यात आल्या तेंव्हा या गोळीबाराने धक्का बसलेल्या पत्नीने हंबरडा फोडला आणि लोकांकडे पतीला वाचविण्यासाठी मदत मागितली पण माणूसकीहीन झालेले लोक मदत करण्यापेक्षा त्याचा व्हिडीओ काढण्यात मग्न झाले होते.  अखेर पत्नीच्या मांडीवरच पतीने जीव सोडला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी ना लोक पुढे आले ना पोलीस पुढे आले.

या विषयी पोलिसांनी सांगितले कि , मृत व्यक्ती कोलकाता येथील  टायर व्यावसायिक आहे. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. जेव्हा मयत  मोहम्मद फैजल त्याच्या नवविवाहित पत्नी अंजुम खातूनसमवेत बाघ एक्स्प्रेसने कोलकाता जाण्यासाठी थांबला होता. दरम्यान, एका अज्ञात इसमाने प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर असलेल्या फैजलला मागून गोळ्या घातल्या. क्षणार्धात  फैजल खाली कोसळला. पत्नी अंजुमने ताबडतोब फैजलचे डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि लोकांच्या मदतीसाठी सतत प्रार्थना करत राहिली.

‘कृपया कोणीतरी वाचवा, कृपया कुणाला तरी मदत करा’ असं अंजुम ओरडत राहिली पण लोकांनी मात्र याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. तिच्या या मदतीच्या आवाजाने कोणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. थोड्या वेळाने अंजुमची चौकशी करत एक पोलीस आला पण त्यानेही पीडितेला दवाखान्यात नेण्याची चपळता दाखविली नाही. अखेर फैजलचा मृत्यू झाला. सुलतानपूर येथे तिच्या सासरहून कोलकाताला ट्रेन पकडण्यासाठी निघाली असल्याचं पत्नीने पोलिसांना सांगितले. मुझफ्फरपूर एसआरपी संजय कुमार यांनी सांगितले की, फैजलचे ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते आणि तो पत्नीला घेण्यासाठी कोलकाताहून सीवान इथे आला होता. तर अद्याप हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. असंही ते म्हणाले.

विशेष म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा बसलेला नाही, त्यावर एसआरपी म्हणाले, “स्टेशनवर कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे.” ते म्हणाले की आरोपींना ओळखण्यासाठी जवळपासच्या दुकानातून काही व्हिडीओ क्लिप घेण्यात आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!