Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना , शुक्रवारपर्यंत आरोपींच्या मृतदेहावर अंत्यसंसकार न करण्याच्या न्यायालयाच्या सूचना

Spread the love

हैदराबाद येथील  एका महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार  आणि खून प्रकरणातील  चारही नराधमांना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर करुन ठार मारले. यावरून हैद्राबाद पोलिसांची एकीकडे स्तुती केली जात असतानाच त्यांच्या एन्काऊंटवर काही जनसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून  तेलंगणा पोलिसांवर टीका होत आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई कायद्याला धरुन नव्हती, असे काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तेलंगणा सरकारने हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम. भागवत हे या पथकाचे प्रमुख आहेत.

याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेलंगणा सरकारने विशेष पथक स्थापन केले आहे. हे पथक पोलिसांची सविस्तर चौकशी करणार आहे. त्याचबरोबर एन्काऊंटरबाबत साक्षीदार कोण आहेत हे पाहणार असून साक्षीदाराचा जबाब नोंदवणार आहे.

दरम्यान देशभर गाजत असलेल्या हैदराबात एन्काउंटर प्रकरणावर तेलंगणा हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी हायकोर्टानं आदेश देत आरोपींच्या मृतदेहांवर शुक्रवारपर्यंत अंत्यसंस्कार करू नका, ते मृतदेह जतन करून ठेवा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर आता या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे. काही सामाजिक संघटनांनी याबाबत तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती.  पोलिसांना आता सर्व शंकांचं उत्तर कोर्टात द्यावं लागणार आहे.

हैदराबादच्या हद्दीत शमशाबाद इथे 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि खून करण्यात सामील असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी सायबराबाद पोलिसांनी एका चकमकीत ठार केलं. पोलिसांच्या अहवालानुसार, मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार, आणि चिंताकुंता चेन्ना केशवुलू या चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करून चौघांनी ठार मारल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या चार मृत आरोपींपैकी एकाच्या पत्नीने आपल्या पतीचा दफनविधी करण्यास नकार देत तिने एन्काउंटरविषयी नाराजी व्यक्त करताना  “किती लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची अशी शिक्षा मिळते, असा सवाल करत तिने म्हटले आहे  की, “या आरोपींना ज्या पद्धतीने गोळी मारण्यात आली, तशी जेलमध्ये असलेल्या अन्य आरोपींनाही मारण्यात यावी. तोपर्यंत आम्ही शवाचा दफनविधी करणार नाही.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!