मानवतेला काळिमा फासणारी घटना : दोन सख्ख्या भावांनीच केला अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार !! दोघांनाही ठोकल्या बेड्या

Spread the love

देशभर चालू असलेल्या लैंगिक अत्याचाराचे लोण महाराष्ट्रातही आले असून बॅलटकराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत . याच मालिकेत मानवतेला काळिमा फासणारी घटना विदर्भातील गंगापूर-टाकळघाट येथे उघडकीस आली आहे . या घटनेने तर बहीण-भावाच्या नात्यालाच  काळिमा फसली आहे.

या लज्जास्पद प्रकरणात  दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन बहिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने खळबळ माजली आहे. आकाश संजय कारमोरे (वय २७) व शुभम संजय कारमोरे (वय २१, दोघेही गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट) या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , १४ वर्षीय पीडिता मूळची भंडारा जिल्ह्यातील लाखनीची आहे. आई आणि वडील विभक्त असल्याने आई बुटीबोरी परिसरातील टेंभरी येथे राहाते व एका विश्रामगृहात मोल मजूरी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलगी लाखनी येथे शिकत असून दिवाळीच्या सुटीत ती आईकडे आली होती. आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला व गोडीगुलाबीने बोलून तिला आमिषे दाखवले. मुलगी आमिषांना भूलल्याने आकाशने तिला पळवून नेले. दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी तिला शोधून पोलिस ठाण्यात आणले.

महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आकाशने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. तसेच आकाशने तिला गंगापूर येथील त्याच्या मामाकडे ठेवल्याचे सांगितले. आकाशने पीडितेला आई वडील नसल्याचे कारण मामाला सांगितले होते. तिथे शुभमनेही तिच्याशी शरीर संबंध ठेवल्याचे सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी भादंवि कलम ३६३, ३६६  आणि ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.

आपलं सरकार