Crime News Update : ओळखीचा म्हणून लिफ्ट घेतलेल्या परिचारिकेवर तरुणाचा बलात्कार ….

Advertisements
Advertisements
Spread the love

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) शहरात  एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत तरुणीवर बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजेश सुरेश कांबळी (३०) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रविवारी रात्री घडली.

Advertisements

याबाबत अधिक माहिती देतांना पोलिसांनी सांगितले कि , देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेली शिकाऊ परिचारिका रविवारी काम आटोपल्यानंतर ती देसाईगंज येथील बसस्थानकावर पोहचली. बसची वाट पाहत असतानाच तेथे तिची आरोपी राजेश कांबळीशी भेट झाली. राजेश हा ओळखीतला असल्यामुळे ती या तरुणाच्या मोटारसायकलवरून बसून विश्वासाने घराकडे निघाली.

Advertisements
Advertisements

दरम्यान तिच्या एकटेपणाचा फायदा घेत शिवराजपूर फाट्यावरील शेतात नेऊन आरोपी राजेशने  तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी, झालेल्या झटापटीत ती बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाला, असे  समजून राजेश तिचा मोबाईल आणि अन्य साहित्य घेऊन पसार झाला. इकडे  गावाकडे येणारी बस आणि अन्य वाहने येऊन गेली पण अजूनही मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी पीडितेच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, पंधरा-वीस वेळा प्रयत्न करुनही मुलीने प्रतिसाद न दिल्यानं वडिलांनी आपल्या मुलासह मोटारसायकलने देसाईगंज गाठले. जिथे ती काम करत होती त्या रुग्णालयातही विचारपूस केली. परंतु, ती बऱ्याच वेळापूर्वी रुग्णालयातून गेल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे वडिलांनी शहरात इतरत्र तिचा शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही.

दरम्यान पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर ती प्रयत्न करूनजवळच असलेल्या राईस मिलमध्ये गेली. तिथे उपस्थित इसमांना तिने आपबिती सांगितल्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहचवली. त्यानंतर तिच्या  वडिलांनी आणि भावाने तिला राईसमिलममधून  घरी नेले आणि रात्री साडेअकरा वाजता देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून आरोपी राजेश कांबळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैद्यकीय उपचारांसाठी पोलिसांनी  पीडित मुलीला गडचिरोली येथील रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी आरोपी राजेश कांबळीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आपलं सरकार