Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Shocking : शाळकरी विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार , इंग्रजी शाळेचा ६८ वर्षीय मुख्याध्यापक गजाआड

Spread the love

इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर मुख्याध्यापक असलेल्या ६८ वर्षीय व्यक्तीने १५ वर्षीय विद्यार्थावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक  घटना उघडकीस आली आहे.  मोहम्मद अली असे या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव असून त्याला  कामशेत पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातील एका शाळेत हि घटना घडली.

विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी याच वसतिगृहात केअरटेकर रसूल यानेही  १४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करत असतानाच कामशेत पोलिसांसमोर हि घटना उघड झाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत परिसरात असणाऱ्या वसतिगृहात ज्यांना आई वडील नाहीत असे मुले शिक्षण घेतात, तसेच तिथे वस्तीगृहाचीही सोय आहे. याच वसतिगृहातील केअरटेकर रसूल याने एका १४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलाला नातेवाईक घरी घेऊन गेले होते. तेव्हा, ही गंभीर घटना नातेवाईकांना मुलाने सांगितली होती.  नातेवाईकांनी कामशेत पोलिसात त्याविषयी तक्रार देताच  केअरटेकर रसूलला जेरबंद करून त्याचा तपास  सुरु केला होता त्यात  अन्य एका १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची  घटना उघडकीस आली.

सदर घटनेचा अधिक तपास केला असता यात मुख्याद्यापक मोहम्मद अली यानेही १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे  उघड झाले . कामशेत पोलिसांनी मोहम्मद अली यास  अटक केली असून रसूल आणि मुख्याद्यापक मोहम्मद अली हे दोघेही आता येरवडा कारागृहात आहेत. दोन्ही घटना या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात घडल्या असल्याचे  कामशेत पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!