Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्लीतील धान्य बाजारात अग्नितांडव , ५० जणांचा भाजून मृत्यू , अनेक जखमी

Spread the love

राजधानी दिल्लीतील धान्य बाजार परिसरात ही आज रविवारी  पहाटे ५.२२ च्या सुमाराला लागलेल्या  आगीत आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिलीय. आगीची माहिती मिळताच गर्गही घटनास्थळी दाखल झाले.पहाटे लागलेली ही आग आता पूर्णपणे विझली असल्याची माहिती दिल्ली उप अग्निशमन दल प्रमुख सुनील चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे . बचावकार्य सुरू असून या कामाला ३० अग्निशमन दलाचे बंब कार्यरत असल्यात्यांनी सांगितले.

अग्निशामक दलाच्या जवानांकडून  अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग आटोक्यात आली असली तरी इमारतीच्या खिडक्यांमधून काळा धूर निघत आहे. या मुळे आत आग सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

घटनेची अधिक माहिती देताना उप अग्निशमन प्रमुख सुनील चौधरी यांनी सांगितले की, ही आग ६०० चौरस फूट भूखंडात आग लागली. इथे आग लागली तेव्हा अंधार होता. येथील कारखान्यांमध्ये शाळेच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर अनेक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. हे कारखाने निवासी भागात अवैधपणे सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचल्यावर त्यांना आतील खोल्यांमधून वाचवा, वाचवा अशा किंचाळ्या ऐकू येत होत्या. खोल्यांचे दरवाजे उघडल्यावर काही लोकांना बाहेर निघता आले. ठार झालेल्यांपैकी बहुतेक लोक बेगूसराय, बिहारमधील समस्तीपूर या जिल्ह्यातील आहेत. त्याचबरोबर, मृतांपैकी काही उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधून आल्याचे वृत्त आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राणी झांडी रोडजवळील अनाज मंडीतील एका फॅक्ट्रीला सकाळी अचानक भीषण आग लगाली. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत गंभीर भाजलेल्यांना सफदरजंग आणि एलएनजेपी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, फॅक्ट्रीमध्ये सकाळी कामगार गाढ झोपले असताना अचानक आगीचा तांडव झाला. अनेकांचा आगीच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत या दुर्घेटनेबाबत दुख: व्यक्त केले आहे.  ही खुपच दुख:द घटना घडली, मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलेय.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!