Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : मोठी बातमी : आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पर्दापाश , चौघांना पोलिस कोठडी

Spread the love

औरंगाबाद – कोलकता आणि हैद्राबादेहून शहरात वेश्या मागवून शहरातील बीडबायपास वरील राजेश नगरात चालविण्यात येणार कुंटणखाना उद्ध्वस्त करून हे सेक्स रॅकेट चालवणार्‍या आठ जणांना गुन्हे शाखेने अटक केली . दलाल असलेल्या चौघांना पोलीस कोठडी मिळाली असून ४  ग्राहकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली तर  घटनास्थळी आढळून आलेल्या चार पिडीतांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.नागनाथ कोडे यांनी दिली. ग्राहक आरोपीमधे प्रोझोन माॅलचा प्रमुख मो. अरशद साजीद अली यांचाही समावेश आहे.

एका रो-हाऊस आणि एका बंगल्यात हा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सुरू होता. वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींमध्ये दोन आसाम, एक हैदराबाद आणि एक स्थानिक तरुणीचा समावेश आहे.

सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितले की,  बीड बायपासवरील राजेश नगर येथील एका घरात वेश्या व्यवसाय केला जात असल्याची खबर गुन्हे  त्यांना मिळाल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शनिवारी गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे यांचे पथक आणि दोन पंच एक डमी ग्राहक अशी टीम सोबत घेऊन राजेश नगरमधील घर गाठून संशयित घरावर छापा मारून हि कारवाई केली.

डॉ . कोडे पुढे म्हणाले कि , घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहकाला संशयित घरात पाठवले. या ग्राहकाने ठरल्याप्रमाणे तरुणीची मागणी केल्यानंतर  दलाल संजय कापसे आणि आंटीने त्यांच्याकडून पैसे घेऊन चार तरुणी उभ्या केल्या आणि त्यांना एका खोलीत जाण्यास सांगितले यावेळी पोलिसांच्या डमी ग्राहकाने खिडकीतून इशारा करताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पंचांच्या समक्ष त्या घरावर धाड टाकली. कारवाईनंतर पोलिसांनी तरुणींची मुक्तता करून त्यांना सुधार गृहात पाठविले आणि उपस्थित  दोन महिला आंटी, दलालांसहित ४ ग्राहकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कलमानुसार पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून विदेशी मद्याचे १० बॉक्स जप्त केले आहेत. याची किंमत सुमारे एक लाख ४४ हजार ९३० आहे.  यावेळी घेण्यात आलेल्या झडतीत दारूच्या बाटल्यांसह ग्राहकांचे मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

आरोपींमधे दलाल १. संजय कापसे,(४४) रा.गणेशनगर गारखेडा, २. विनोद टेकचंद नागवणे (३५) रा. एम.आयटी. हाॅस्पिटल एन. ४ सिडको व अन्य दोन महिला. तर ग्राहकांमधे १.  प्रोझोन माॅल चा प्रमुख मोहम्मद अरशद साजिद अली (२९) रा.चिकलठाणा, २. अजय सुभाष साळवे(२३) रा. आनंदनगर भारतनगर, ३. बदनापुरचा रेशनदुकानदार ज्ञानेश्वर जर्‍हाड(४२) ४. अमोल दामू शेजूळ(२९) म्हाडा काॅलनी मुकुंदवाडी या नावांचा समावेश आहे.

वरील कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ. नागनाथ कोडे यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, नितीन मोरे भगवान शिलोटे, पोलिस कर्मचारी सरिता पाटील, विशाल भोपळे,यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!