Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“ऐश्वर्या मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण ऐश्वर्या तर एकच आहे…” भाजपच्या विधानाने सर्वच आचंबित !!

Spread the love

ऐश्वर्या मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण ऐश्वर्या तर एकच आहे, तसेच उपमुख्यमंत्री पदाचेही आहे.’ असे अजब विधान कर्नाटकमधील भाजपाच्या ज्येष्ठ मंत्री महोदयांनी केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलेच लोळवले जात आहे. या ज्येष्ठ मंत्री महोदयांचे नाव के. एस. ईश्वरप्पा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पोटनिवडणुकीच्या निकाल उद्या सोमवारी येणार आहे. ते बागी आमदार आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शनिवारी हे अजब विधान केलं. के. एस. ईश्वरप्पा हे कर्नाटकातील ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री आहेत. अपात्र आमदार पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले तर त्यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री करावे लागणार आहे का? असा प्रश्न ईश्वरप्पा यांना पत्रकारांनी  विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तुलना ऐश्वर्याशी केली. ते म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्रिपद कोणाला नकोय? सत्तेची ताकद प्रत्येकालाच हवी असते. तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या रायशी लग्न करावसं वाटतं. पण ऐश्वर्या तर एकच आहे ना. महत्वकांक्षा असली म्हणून प्रत्येकालाच उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकत नाही ?’

कर्नाटकमध्ये १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा उद्या सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपची कसोटी असून, सहा जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार वाचू शकणार नाही. यामुळेच या पोटिनवडणुकीत भाजपाने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. अर्थात  नऊ डिसेंबर रोजी लागणाऱ्या या निकालाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या कर्नाटक विधानसभेत २०८ सदस्य आहेत. एका अपक्षासहीत भाजपाची सदस्य संख्या १०५ असून  काँग्रेसचे ६६ आणि जेडीएसचे ३४ आमदार आहेत. तर बसपाचा एक सदस्य आहे.

कर्नाटकातील काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार १७ आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तसेच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे आमदार अनुपस्थित राहिल्याने कुमारस्वामी सरकार पडले  होते. पुढे या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. त्यामुळे बागी उमेदवार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!