Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : मिझोरम येथील काही चोरीच्या ट्रकची औरंगाबादेत विक्री, अधिक तपास चालू आहे…

Spread the love

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात गेल्या महिन्यात चोरीच्या ट्रकची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या वर्षात ट्रक चोरी प्रकरणात समोर आले होते. त्यात मोठ्या टोळीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले होते. त्याच आधारावर गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अमोल देशमुख यांनी चौकशी सुरू केली. शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी या पथकाने आरटीओ कार्यालयाला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी मिझोरम राज्यातून आणलेल्या पाच ट्रकच्या क्रमांकाची माहिती देऊन त्यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना  केली होती. या प्रकरणात चोरीच्या ट्रकची नोंदणी केल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होत गेले.

या गाड्यांची नोंदणीही औरंगाबाद आरटीओ कार्यालयात झाल्याची माहिती पोलिस विभागाला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासणी सुरू केली. या प्रकरणात आरटीओ कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारी आणि संबंधीत विभागाच्या लिपीकांचीही चौकशी करण्यात आली आहे.

या प्रकरणात आरटीओ कार्यालयातील एका सहाय्यक परिवहन अधिकारी (एआरटीओ) यालाही पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. शनिवारी (७ डिसेंबर) रोजी या अधिकाऱ्याकडून तीन तास चौकशी करण्यात आली. यानंतर ७ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत पाच ट्रक नोंदणीच्या प्रकरणातील सर्व अभिलेखे घेऊन आरटीओ कार्यालयातील एक लिपीकही हजर झाल्या होत्या. अशी माहिती आरटीओच्या सुत्रांनी दिली.

असा बळावला संशय

वाहनांची पासिंग करण्यासाठी परराज्यातून आलेल्या वाहनांची एनओसी व अन्य आवश्यक कागदपत्रे तपासून त्याची पासिंग करण्यात येत असते. या प्रकरणात ती कागदपत्रे व्यवस्थितीत असून या ट्रकची पासिंग करताना एकाच अधिकाऱ्याने वाहन निरिक्षकाचेही काम केले, तसेच ऑर्डर देण्यासाठी डेप्युटी आरटीओचेही अधिकार वापरल्याची चर्चा आहे. तसेच या प्रकरणात ज्या ग्राहकाच्या नावावर हे ट्रक करण्यात आले होते. त्याचाही आधार कार्ड आणि पत्ता बोगस असल्याची चर्चा झाली. यामुळे या चोरीच्या ट्रक नोंदणी प्रकरणात काही काळे बोरे झाल्याचा संशय समोर आला आहे.

दोन जणांना ताब्यात घेतल्याचीही चर्चा आहे पण पीएसआय देशमुख यांनी इन्कार केला

ट्रक चोरून विक्री करण्याच्या या नवीन रॅकेट प्रकरणात दोन जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यात मुजीब आणि सलीम अशी दोघांची नावे असून या दोन आरोपींकडून गुन्हे शाखेचे पोलिस शहरात किती चोरीची वाहने विक्री करण्यात आली आहे. याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुन्हे शाखेकडे तपास ..

ट्रक नोंदणी प्रकरणाची सद्यस्थितीत माझ्याकडे माहिती नाही. गुन्हे शाखेकडून याबाबत तपास केला जात आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.या बाबत परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही

मालकी हक्काचे पुरावे

ट्रक चोरीच्या रॅकेट प्रकरणात गुन्हेशाखेचा तपास सुरू आहे. या प्रकरणात त्याचे मालकी पुरावे मिळाले की आणखी काही प्रकार आहे. ?  याबाबत आपण रिव्ह्यू घेत आहोत.

चिरंजीव प्रसाद, पोलिसआयुक्त

आपलं सरकार

Click to listen highlighted text!