Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने गायरान जमीन विकली, दुय्यम निबंधकासह चौघाविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : शासनाने कसण्यासाठी दिलेली सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने चार जणांनी परस्पर विकली. याप्रकरणी चौघाविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सरकारी गायरान जमीन विकणा-यांमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयातील एका अधिका-याचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बारकू  आवचरमल, कचरू केरूबा शिंदे, रा.घारदोन तांडा, महेशकुमार पुरणमल प्यारपानी (वय ४७, रा.जानकीनगर, जळगांव), दुय्यम निबंधक सतीश कुलकर्णी, दुय्यम निबंधक कार्यालय, बिडबायपास, सातारा परिसर अशी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने गायरान जमिन विकणा-यांची नावे आहेत. समाज कल्याण विभागाच्या वतीने शेतक-यांना देण्यात आलेल्या जमीनीची बनावट कागदपत्रे तयार करून चौघांनीही सदरील जमीन ११ जुन २०१४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, बिड बायपास, सातारा परिसर येथे रजिस्ट्री करून विक्री केली होती. त्यासाठी त्यांनी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

या प्रकरणी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी संभाजी शेळके (वय ५८, रा.समृध्दीनगर, सिडको एन-४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन विकणा-याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दासरे करीत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!