Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हैदराबाद एन्काउंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Spread the love

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी चकमकीत ठार केले. एकीक़डे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरविरोधात आज (शनिवारी) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटेच पोलिस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चौघांनाही गोळ्या घालण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

अॅडव्होकेट सीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी हैदराबाद एन्काउंटरविरोधात या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कोर्टाने सन २०१४ ला दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही, असे या याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर करण्याची आवश्यकता असून त्यांच्यावर कारवाई केली जावी असे याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!