Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अहमदनगर : राहाता येथील विवाह सोहळ्यातून महिलेची पर्स लांबविली , ७ लाखाच्या ऐवजावर मारला हात

Spread the love

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात कुंदन लॉन येथे एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली आहे . या पर्समध्ये  १७  तोळे सोने आणि १० हजार रोख असा ७ लाख रूपये किंमतीचा ऐवज होता . या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला असून सदर चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याचा शोध चालू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , मिळालेली माहिती अशी की, राहाता शहरातील कुंदन लॉन्स येथे ही घटना घडली आहे. श्रीरामपूर येथील उद्योजक मुळे यांच्या कुटूंबातील विवाहासाठी डॉ.मंजुषा नरेंद्र कुलकर्णी (रा. नंदीग्राम कॉलनी, औरंगाबाद) आल्या होत्या. त्या विवाहस्थळी खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांच्या बहिणीने पर्स त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिली असताना त्यांनी शेजारील मोकळ्या खुर्चीवर हातातील पर्स ठेवली व नातेवाईकांशी बोलत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स पळवली. या प्रकरणी डॉ मंजूषा कुलकर्णी यांनी राहाता पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या पर्समध्ये दोन राणी हार व दोन कानातले जोड वजन साडेतीन तोळे, साखळी मनी व पदक वजन ७ तोळे, नेकलेस , चार बांगड्या, दोन अंगठ्या, एक ब्रासलेट, सॅमसंग कंपनीचे दोन मोबाइल, एटीएम, पॉवर बँक असे सर्व साहित्य होते. १७ तोळे सोने व १० हजार रूपये रोख असा सुमारे सात लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला आहे.

या प्रकरणी राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. लॉन्समधील सीसीटीव्हीचे फुटेच पाहिले असता एक संशयित तरुण हातात पर्स घेऊन जाताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राहाता शहरातील मंगल कार्यालयात अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच गर्दीत गंठन चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. अशा अनेक गुन्ह्यांचा तपास अजूनही प्रलंबित आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!