महाराष्ट्रातील सत्ताकारण : मुख्यमंत्री- शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यात गुफ्तगू , खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

Advertisements
Advertisements
Spread the love

 

राज्यातील सत्तास्थापनेनंतरही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणाकुणाला मंत्री करायचे हे अद्याप  होत नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु असल्याचे वृत्त एबीपी माझाने  दिले आहे.

Advertisements

शिवसेनेकडून या बैठकीला एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपाचे सूत्रही निश्चित झाले आहे.

Advertisements
Advertisements

लवकरच अन्य मंत्र्यांचाही शपथविधी होईल असे सांगितले जात होते. परंतु आठदिवसांत फक्त मुख्यमंत्री व सहा मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे व मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. परंतु खाते वाटप अजून रखडलेले आहे. काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठा गर्दी आहे. १२ मंत्रिपदांचे वाटप करताना प्रादेशिक व सामाजिक समतोल साधावा लागणार आहे.

आपलं सरकार