Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महापरिनिर्वाणदिन : डॉ. बाबासाहेबांचे २२ वर्षे वास्तव्य राहिलेल्या बीआयटी चाळीला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

Spread the love

मुंबईच्या परळ येथील ज्या बीआयटी चाळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ वर्षे वास्तव्य केलं होतं, बाबासाहेब ज्या खोलीत राहिले होते, तेथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी  या चाळींची पाहणी करणार आहे. आजवरच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी बीआयटी चाळींची पाहणी केली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची हि भेट नक्कीच लक्षणीय मनाली जात आहे. याच चाळीत बाबासाहेबांना भेटण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आले होते असा इतिहास आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद:स्पर्शाने पावन झालेली परेल इथल्या बी. आय. टी. चाळ क्रमांक एक मधील खोली क्रमांक ५० आणि ५१. डॉ. आंबेडकरांनी १९१२ आणि १९३४ मध्ये वास्तव्य केलं होतं. डॉ. आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ या निवासस्थानी व्यतीत केला होता.  या ठिकाणी त्यांचे अनुयायी आणि नातेवाईक खैरे आणि तडिळकर यांचे वास्तव्य आहे.

उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी साडेसात वाजता परळच्या बीआयटी चाळींमध्ये जाणार आहेत. बीआयटी चाळी जर्जर झाल्या असून त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. यापार्श्वभूमीवर बीआयटी चाळीत जाऊन तिथल्या रहिवाशांशी ते संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे चाळकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परळच्या दामोदर नाट्यगृहाजवळ या चाळी आहे. बीआयटी चाळीत एका माळ्यावर २० खोल्या आहेत. अशा तीन मजल्यांच्या ६ इमारतींमध्ये ४८०० खोल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच बीआयटी चाळीत राह्यचे. दरम्यान, ज्या बीआयटी चाळीत बाबासाहेब आंबेडकर २२ वर्ष राहिले, त्या बीआयटी चाळीचं स्मारकात रुपांतर करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. बीआयटी चाळींची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री थेट चैत्यभूमीला येणार असून बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्यासाठी रवाना होणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!