Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : चैत्यभूमीवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी, मुख्यमंत्री , राज्यपालांचे अभिवादन , बीआयटी चाळीतील निवासस्थानी बनवणार राष्ट्रीय स्मारक : उद्धव ठाकरे

Spread the love

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २२ वर्षे जिथे वास्तव्य केले ते परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली.

बीआयटी चाळ क्र. १ मधील खोली क्रमांक ५० व ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे १९१२ ते १९३४ असे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात विद्वान व महामानव म्हणून प्रसिद्धीस पावले. त्यांच्या जीवनात या वास्तूचे खूप महत्त्व होते. बीआयटी चाळ क्रमांक १ मधील या दोन खोल्यांमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील हा एतिहासिक वास्तूरूपी अमूल्य ठेवा जतन करावा आणि त्या ठिकाणी यथायोग्य स्मारकाची निर्मिती करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आज हा निर्णय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मागणीची पुर्तता केली.

परळ येथील बीआयटी चाळीतील डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार: मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

मुंबई काँग्रेसचा कँडलमार्च

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी गुरुवारी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे, मुंबईतील हिंदू कॉलनी, दादर पूर्व येथील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह ते चैत्यभूमीपर्यंत ‘कँडल मार्च’ काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र विचार, त्यांच्या पवित्र विचारांचा प्रकाश संपूर्ण जन्मानसापर्यंत पोहचवणे हे या ‘कँडल मार्च’चे उद्दिष्ट असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीकडे येण्यास सुरुवात झाली आहे. ही अलोट गर्दी दादर स्थानकातून हळूहळू चैत्यभूमीकडे सरकत आहे. दादर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

औरंगाबाद: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. सुखदेव थोरात यांचे व्याख्यान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आदरांजली

आमदार अजित पवारांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त  पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पगुच्छ वाहून विनम्र अभिवादन केले.

 

दादर स्थानकावर बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी मार्गदर्शनपर फलक लावले आहेत. कोणता रस्ता चैत्यभूमीकडे जातो आणि कोणता रस्ता राजगृहाकडे जातो याबाबतची उद्घोषणा रेल्वेमार्फत सातत्याने सुरू आहे.

पहाटेपासूनच हजारो अनुयायांची गर्दी चैत्यभूमीवर लोटत आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!