Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी बँकेचे महत्वाचे आवाहन….

Spread the love

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आपले डेबिट कार्ड बदलण्याची तारीख जाहीर केली असून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ग्राहकांनी अत्याधुनिक ईएमव्ही चिपचं कार्ड घ्यावं, असं आवाहन बँकेने केलं आहे. दिलेल्या मुदतीत एसबीआयचे  जुने  कार्ड बदलून घेतले नाही तर या कार्डची सेवा बंद होणार आहे. जुन्या मॅग्नेटिक स्ट्राईपच्या कार्डऐवजी ग्राहकांना आता नवीन अधिक सुरक्षित असलेलं कार्ड घ्यावं लागेल.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे कि , मॅग्नेटिक स्ट्राईपचं कार्ड बदलून यापेक्षा सुरक्षित असलेलं ईएमव्ही चिपचं कार्ड आणि पिनवर आधारित डेबिट कार्ड घेण्यासाठी तुमच्या होम ब्रांचमध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करा. खात्रीशीर, अधिकृत आणि ऑनलाईन पेमेंटसाठी पहिल्यापेक्षा अत्याधुनिक कार्ड घेऊन फसवणुकीपासून सुरक्षित राहावे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एसबीआयने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड अत्याधुनिक आणि सुरक्षित ईएमव्ही चिपमध्ये अपग्रेड केले आहेत. कार्ड बदलून घेणं मोफत असल्याचंही एसबीआयने सांगितले  आहे. यासाठी ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जावे  लागेल. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं असेल, तर ते पुराव्यासह दाखवा, रिफंड दिला जाईल, असंही बँकेने सांगितले  आहे.

दरम्यान, ग्राहक इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही ईएमव्ही चिप कार्डमध्ये अपग्रेड होऊ शकतात. मात्र अर्ज करण्यासाठी तुमचा पत्ता योग्य आहे का, त्याचीही अगोदर खात्री करा. कारण, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कार्ड नोंदणीकृत पत्त्यावरच येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मोबाईल नंबर अनिवार्य आहे.

ऑनलाईन अर्ज करताना…

सर्वात अगोदर एसबीआयच्या वेबसाईटवर लॉग इन करा

टॉप नेव्हिगेशनच्या ई सर्व्हिसेसमध्ये एटीएम कार्ड सर्व्हिस निवडा

व्हॅलिडेट करण्यासाठी तुमच्यासाठी योग्य असलेला पर्याय निवडा, आता युझिंग वन टाईम पासवर्डवर (ओटीपी) क्लिक करा

नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी मागवा

अकाऊंट निवडा आणि त्यात कार्डवर नाव आणि प्रकार टाका

टर्म अँड कंडिशन्सवर क्लिक करा आणि पुन्हा सबमिट बटण दाबा

सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर मेसेज दिसेल, ज्यात लिहिलेलं असेल की, कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर ७ ते ८ कार्यालयीन दिवसांमध्ये येईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!