Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एटीएम कार्ड वापरण्याचे बदलत आहेत नियम , आयसीआयसीआय बँकेकडूनही मोठे बदल

Spread the love

सरकारकडून बँक व्यवहाराची दिवेसंदिवस सक्ती केली जात असून बँकांच्या सेवाशुल्कात बँकांकडून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याच नव्या बदलांतर्गत  विविध बँकांची ATM कार्ड वापरण्याचे नियम बदलत  आहेत. रिझर्व बँकेने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. ३१ डिसेंबरला एटीएम सेवा पुरवठादारांसाठी  ATM Service Provider नवी नियमावली जारी होणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं रिझर्व बँकेने सांगितले  आहे. सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात येणार आहेत.

व्यापारी बँका आणि नागरी सहकारी बँकांमध्ये ATM swtich application सेवा पुरवठादाराप्रमाणे बदलतं. त्यासाठीचे नियम नाहीत. ते ३१ डिसेंबरला जारी होतील. ते झाल्यानंतर एटीएम वापरण्यासंबंधीचे नियम ग्राहकांसाठीही बदलू शकतात.

दरम्यान १५ डिसेंबरपासून काही बँकांनी एटीएम सेवेसाठी जादा पैसे आकारायचं ठरवलं आहे.  तुमचं जर ICICI बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. १५ डिसेंबरपासून आयसीआयसीआय बँक बचत खात्याच्या काही नियमांमध्ये बदल करणार आहे. तुम्हाला जर हे बदलेले नियम माहीत नसतील तर तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बचत खात्यात पैसे भरणं, आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून चार्ज लावण्यात येणार आहे. त्यामुळे बदलेल्या नियमांची माहिती नसल्यास तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!