Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नरेंद्र मोदी ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर , खा. अमर साबळेंची बौद्धिक दिवाळखोरी

Spread the love

नरेंद्र मोदी हे ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा शब्दांत खासदार साबळे यांनी मोदींची भलावण करीत आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. भाजपामध्ये ओबीसी समाजातील नेत्यांवर अन्याय होत असल्याच्या उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी वर्गाला भाजपात आजिबात डावललं जात नसल्याचे भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसी वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवैधानिक  अधिकार मिळवून दिला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले आहे.

अमर साबळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण एससी, एसटी नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले होते, हे आश्वासन त्यांनी पाळले आहे. त्यानुसार, बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एससी, एसटी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. लोकसभा आणि राज्यसभेत या वर्गांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे या भावनेने संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. २००९ मध्ये वाढवलेल्या या राजकीय आरक्षणाची मुदत जानेवारी महिन्यांत संपत असल्याने मोदी सरकारने ती पुन्हा दहा वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही साबळे यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!