Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : आर.के. कन्स्ट्रक्शनकडून डाॅक्टरला १७ लाखांचा गंडा, फसवणूकीची रक्कम वाढण्याची शक्यता, बिल्डर विरुध्द गुन्हा

Spread the love

औरंगाबाद – आठ वर्षांपूर्वी जालनारोडवरील हिरापूर शिवारात आर.के. कंस्र्क्टक्शन ने डाॅक्टरला विकलेला फ्लॅटचा ताबा घेण्यास गेल्यावर डाॅक्टरच्या फ्लॅटला बॅंकेने सील ठोकल्याचे लक्षात येताच डाॅक्टरने पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला.
२०११मधे क्रांतीचौक परिसरातील आर.के. कंस्र्टक्शन चे समीर मेहता यांने जालनारोडवरील हिरापूर शिवारात काहि फ्लॅट बांधले आहेत. हा प्रकल्प मेहता ने एस.बी.आय. बॅंकेकडून कर्ज काढून पूर्ण केला होता. त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण झाल्यावर ग्राहकांना या प्रकल्पावर असलेले एस.बी.आय. बॅंकेचे कर्ज नील केल्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिलै.या मुळे प्रत्त्येक फ्लॅटची रजिस्र्टी करता यावी . यामुळै मुंबईचे डाॅक्टर जगदीश मुरलीधर राठोड यांनी औरंगाबादेत समीर मेहता कडे फ्लॅट खरेदी केला.डाॅक्टर राठोड सध्या अरब अमिरातीत एका खाजगी रुग्णालयात नौकरी करतात.व मुंबईला त्यांचे घर आहे. औरंगाबादेत जवाहर काॅलनीत त्यांची सासुरवाडी आहे.बाबूलाल चव्हाण त्यांचे सासरेआहेत. त्यामुळे राठोड यांनी आर. के. कंस्र्टक्शन मधे २०११ला फ्लॅट बुक केला. व २०१६ साली रजिस्र्टी झाली.राठोड जेंव्हा फ्लॅटचा ताबा घेण्यास गेले तेंव्हा एस.बी.आय. बॅंकेचे सील राठोड यांच्या फ्लॅटला लागले होते. राठोड यांनी अधिक चौकशी केली असता आर.के. बिल्डर ची मालमत्ता एस.बी. आय. बॅंकेकडे गहाण असून मेहता ने कर्ज फेडले नव्हते म्हणून बॅंकेने आर.के. कंस्र्टक्शन ची प्राॅपर्टी जप्त केल्याचे उघंड झाले. तरीही तब्बल तीन वर्ष डाॅक्टर राठोड यांनी समीर मेहता कडून हडप झालेले १७ लाख ५हजार रु. परंत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मेहता बधंत नसल्याचे कळताच डाॅक्टर राठोड यांनी बुधवारी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक उत्तम मुळंक करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!