आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात पी. चिदंबरम यांना सशर्त जमीन, काय आहेत अटी ?

Advertisements
Advertisements
Spread the love

तब्बल १०६ दिवसांनंतर आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात तुरुंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम सुप्रीम कोर्टानं आज, बुधवारी त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे चिदंबरम  तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यांना जामीन देण्यास ईडीनं विरोध केला होता. साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात, असं ईडीचं म्हणणं होतं.

Advertisements

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टानं चिदंबरम यांना आज दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. जामीन देताना सुप्रीम कोर्टानं त्यांना अन्य अटीही घातल्या आहेत. चिदंबरम यांनी पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, या प्रकरणात माध्यमांना मुलाखती देऊ नयेत, तसंच कोणतंही वक्तव्य करू नये, सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही , चौकशीला संपूर्ण सहकार्य करावा आदी अटींवर सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन दिला आहे. तब्बल १०६ दिवसांनंतर चिदंबरम हे तिहार तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

Advertisements
Advertisements

जमीन देताना कोर्टाने म्हटले आहे कि , आर्थिक गुन्हे खूपच गंभीर असतात. मात्र, जामिनाचीही कायद्यात तरतूद आहे. जामिनाचा निर्णय खटल्याच्या मेरिटवर अवलंबून असतो. जामीन देण्याची तरतूद कायद्यात आहे,  सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी सुनावणीनंतर जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात याआधीही त्यांना जामीन मिळाला होता. आता मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांना सुप्रीम कोर्टानं जामीन दिला आहे.

आपलं सरकार