Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच दोन दिवसांसाठी येताहेत पुणे शहरात….

Spread the love

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार  संपल्यानंतर पुन्हा राज्यात न आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर  एका महत्त्वाच्या बैठकीसाठी दि. ६ आणि ८ डिसेंबर रोजी पुण्यात येत असल्याचे वृत्त आहे. हे दोनही दिग्गज नेते पोलिसांच्या एका परिषदेसाठी पुण्यात येत असून त्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असणार आहे. प्रदीर्घ कालांनंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणारे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रातील सत्तांतरावर काही भाष्य करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे हे मात्र नक्की.

उपलब्ध माहितीनुसार देशातल्या सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांची परिषद दरवर्षी होत असते. त्या बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहतात. २०१४ पर्यंत ही बैठक दिल्लीत होत असे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये दरवर्षी दिल्ली बाहेर ही परिषद घेण्याचा पायंडा मोदींना पाडला. त्यानुसारच ही परिषद यावर्षी पुण्यात होत आहेत.

पुण्यात होणाऱ्या या परिषदेत  देशभरातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा, राज्य स्तरावर पोलीस दलांमध्ये करायचे आवश्यक बदल, पोलीस आणि गुप्तचर संस्थांमध समन्वय वाढवणं असे अनेक विषय  चर्चेला येणार आहेत. यंदा ही बैठक पुण्यात ६ ते ८ डिसेंबर अशी होणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.

या परिषदेला सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक, गुप्तचर संस्थांचे प्रमुख, ज्येष्ठ पोलीस अधिकारी, गृहमंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उप सुरक्षा सल्लागार दत्ता पडसलगीकर यांचीही या परिषदेला उपस्थिती राहील असे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!