Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इंडो-तिबेटियन सीमा पोलीस दलातील जवानाचा सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार , पाच जणांना ठार करून स्वतःलाही घातली गोळी ….

Spread the love

छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात एका कॅम्पवर इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP) एका जवानाने आज, बुधवारी आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात पाच   जवान ठार झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाड़ून आत्महत्या केली. त्यांच्यात सुट्टीवरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नारायणपूर येथील आयटीबीपीच्या बी/४५ बटालियनच्या केडनर येथील कॅम्पमध्ये बुधवारी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कॉन्स्टेबल रेहमान खान यांनी स्वतःजवळील रायफलमधून सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक  मोहित गर्ग यांनी दिलेल्या  माहितीनुसार, , नारायणपूर येथे इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील जवानांमध्ये आज सकाळी जोरदार वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. यात आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, रहमान खान या कॉन्स्टेबलनं आपल्या पाच सहकारी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.

दरम्यान छत्तीसगडचे पोलीस महानिरीक्षक डी. एम. अवस्थी यांनी  याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले कि , आयटीबीपीच्या नारायणपूरमधील कडेनर कॅम्पमध्ये जवानांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका जवानाने सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी विमानानं रायपूरला नेण्यात आलं आहे. वादामागील कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!